ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Loksabha Election 2024:- लोकसभा निवडणूक २०२४ चा तिसरा टप्पा जवळ आला असून ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष राहिलेल्या जागांवर आपले उमेदवार जाहीर करण्यासाठी घाई करत आहेत. दरम्यान आज सकाळी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कल्याण येथून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) व ठाणे येथून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना संधी देण्यात आली आहे.

ठाणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा सुरुवातीपासून होत आहे. प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे अशी अनेक नावे समोर आली आहे. भाजपकडून देखील संजय केळकरांचे नाव चर्चेत होते. मात्र ही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत. नरेश म्हस्के हे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर ते सभागृह नेता होते. ते ठाण्याचे महापौर देखील होते.

महत्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक पांड्या

Anis Sundke | हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुलमानांचा सुद्धा, अनिस सुंडके यांचे प्रतिपादन

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर यांना उमेदवारी