Agricultural Value Commission | ‘तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या’

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या (Agricultural Value Commission) माध्यमातून पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कृषी मूल्य आयोगाच्या (Agricultural Value Commission) बैठकीला उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केली.

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातील राज्यांच्या प्रतिनिधींची ही बैठक होती. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दीव आणि दमण तसेच महाराष्ट्राच्या प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची बैठक मुंबईत झाली. रब्बी हंगाम २०२५-२६ केंद्रीय कृषी आयोगाची किंमत विषयक धोरण ठरविण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी