गौतम अदानी यांच्या संपत्तीत 6.9 अब्ज डॉलरची घट, श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण

नवी दिल्ली – भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी(gautam adani) यांच्याबद्दल मोठी बातमी आली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांची पुन्हा एकदा तिसर्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सोमवारी भारतीय बाजारात मोठ्या घसरणीमुळे हा प्रकार घडला, त्यानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरची किंमत घसरली.

काल अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली आणि गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 6.91 अब्ज डॉलरने कमी झाली, ज्यामुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर घसरले आणि अॅमेझॉनचे जेफ. बेझोस पुन्हा एकदा पुढे गेले. जेफ बेझोस(jeff bezos) यांच्या संपत्तीत सोमवारी १.३६ अब्ज डॉलरची वाढ झाली, त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती १३८ अब्ज डॉलरवर आली. त्याच वेळी, गौतम अदानी यांची संपत्ती $ 6.91 अब्ज डॉलरने(6.91 billion) घटून $ 135 अब्ज झाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या 10 मधून बाहेर होते, भारताचे मुकेश अंबानी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात पहिल्या 10 च्या यादीतून बाहेर पडले आहेत आणि काल त्यांच्या संपत्तीत $ 2.83 अब्जची घट झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 11व्या स्थानावर घसरले असून त्यांची संपत्ती 82.4 अब्ज डॉलरवर आली आहे. 10व्या स्थानावर लॅरी एलिसन आहे, ज्यांची एकूण संपत्ती $84.9 अब्ज आहे.