Ajit Pawar | अजित पवारांची नवी रणनिती, विधानपरिषद निवडणुकीसाठी विदर्भातून ‘या’ मुस्लीम चेहऱ्याला संधी?

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सपाटून मार खावा लागला. यातून धडा घेत आता आता अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी जोरदार रणनिती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने केलेले मतदान निर्णायक ठरले होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन अजितदादा गटाकडून विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता आहे.

आगामी विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी (Nazer Kazi) यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे.

नाझेर काझी हे अजित पवार यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून ते बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काझी ज्या मतदारसंघात राहतात, त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून डॉ.राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप