Ashadhi Yatra | वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्य परिवहन महामंडळ ५ हजार विशेष एस टी बस गाड्या सोडणार

यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त (Ashadhi Yatra) पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळ ५ हजार विशेष एस टी बस गाड्या सोडणार आहे. याशिवाय कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातूनच एसटी बस सोडली जाणार असून जवळच्या एस टी आगारात संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास तसंच महिलांसाठी ५० टक्के सवलत अशा सर्व योजना लागू राहणार आहेत.

यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवून असणार आहेत. यामुळे फुकट्या प्रवाशांना लगाम बसलण्यास मदत होणार आहे.

पंढरपूर यात्रेसाठी (Ashadhi Yatra) राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी