Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार; अजित पवार समर्थक आक्रमक

Gopichand Padalkar On Ajit Pawar: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना त्यांना ‘लांडग्याचं पिल्लू’ असं म्हटलं आहे. परिणामी गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या (Dhanagar Samaj) मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी त्यांना तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? असा प्रश्न विचारला असता पडळकर यांनी ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे’ असं म्हटलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला. पण अजित पवारांचा उल्लेख त्यामध्ये नव्हता. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले की, “आम्ही अजित पवारांना मानत नाही. अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहायचा विषय नाही. ते आता जरी आमच्यासोबत आले असले तरी त्यांची भूमिका वेगळी आहे. आम्ही अजित पवारांना उपमुख्यमंत्री मानत नाही.”

आमदार गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले. सोमटने फाटा येथे त्यांनी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भाष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही, ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण