Babanrao Taiwade | जरांगे दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का?

Babanrao Taiwade | मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे. त्यांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, या मनोज जरांगेंच्या मागण्यांना आता ओबीसी समाजातून तीव्र विरोध होताना दिसतोय. याविरोधात आता लक्ष्मण हाकेंसह ओबीसी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र आता मुद्द्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांची जास्त चर्चा होताना दिसत आहे.

यातच आता  मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनापूर्वी आणि आंदोलननंतर किती कुणबी नोंदी झाल्या, हे सरकारने श्वेतपत्र काढून जाहीर करावे, अशी मागणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade) यांनी केली आहे.

मनोज जरांगे दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का?, मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात, अशी टीकाही बबनराव तायवाडे यांनी केली. आगामी निवडणुकीत कोण कोणाला पाडतं, ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही बबनराव तायवाडे यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप