Hardik Pandya | ‘नताशासोबत राहणं म्हणजे…’, हार्दिक पांड्या पूर्वीपासून होता पत्नीमुळे हैराण? व्हिडीओ व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच सध्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे ‘पांड्या’ आडनाव टाकल्यावर घटस्फोटाच्या अफवा पसरल्या. यादरम्यान हार्दिक पांद्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे हार्दिक नताशासोबत राहण्यासाठी आधीपासूनच कंटाळला होता अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

व्हिडिओत हार्दिक (Hardik Pandya) म्हणतोय, “तसे, नताशाने मला प्रेम दिले आहे. मी आयुष्यात अनेक गोष्टी सोडवल्या आहेत… कारण तिने मला प्रश्न कसे सोडवायचे हे शिकवले. माझ्या लव्ह लाईफमुळे मी आयुष्यात खूप काही मिळवले आहे. मी पूर्वीपेक्षा जास्त धीर धरला आहे कारण नताशासोबत राहण्यासाठी खूप संयम आवश्यक आहे.” असे तो म्हणतोय.

दरम्यान हार्दिक सध्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन बाळगून आहे. तो सद्या भारतीय संघासोबत टी20 विश्वचषक खेळण्यासाठी न्यूयॉर्कला गेला आहे. तिथे तो भारतीय संघासोबत विश्वचषकासाठी सराव करत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप