केतकी चितळे वर हल्ला करणाऱ्या युवतीवर गुन्हा का दाखल नाही? पोलीस आणि राष्ट्रवादीची मिलीभगत आहे का?

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर हल्ला केला होता एवढंच नव्हे तर तिच्यावर केलेल्या हल्ल्याचं समर्थन देखील त्यांनी माध्यमांसमोर केले होते.

पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई फेकली, धक्काबुक्की केले आणि अंड्यांचा देखील मारा केला होता.कळंबोली पोलीस ठाण्यातून तिला नेलं जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि काळी शाई फेकली.

या सर्व घडामोडींवर आता भाजयुमो चांगलाच आक्रमक झाला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील (Bharatiya Janata Yuva Morcha Maharashtra State President Vikrant Patil) यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलाय. केतकी चितळे वर हल्ला करणाऱ्या युवतीवर गुन्हा का दाखल नाही? राष्ट्रवादी ची एक युवती पुण्यावरून येते एक मुंबईवर येते यांना माहिती कुठून मिळते? यात पोलीस आणि राष्ट्रवादीची मिलीभगत आहे का? या केतकी प्रकरणात पोलिस आणि राष्ट्रवादी कनेक्शन चे नक्की गौडबंगाल काय याची चौकशी करावी असं त्यांनी म्हटले आहे.

पोलीस डिपार्टमेंट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना काँट्रॅक्टवर चालवायला दिले आहे का? सर्जील उस्मानी तमाम हिंदूंना सडकं म्हणाला त्यावर अजून पर्यंत कारवाई करण्याची हिम्मत अजून सरकारने का दाखवली नाही? असा देखील सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.