लोकसभेच्या ‘या’ जागेवरून मविआत धुसफूस; कॉंग्रेस-ठाकरे गट आमने-सामने

Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जोमाने तयारीला लागले असून जागावाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. महायुतीने एका बाजूला राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला असताना दुसऱ्या बाजूला मविआमध्ये मात्र धुसफूस सुरु झाली आहे.

उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभा मतदारसंघाची (Mumbai North West Loksabha) जागा सोडण्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट नकार दिलाय. काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली होती. पण ही मागणी उद्धव ठाकरेंनी फेटाळली असल्याची बातमीABP माझाने दिली आहे.

दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांकडून संजय निरुपम यांच्यासाठी या जागेची मागणी होत होती. त्यासाठी काँग्रेसचे नेते नाना पाटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना गळ घातली होती. पण उत्तर पश्चिम हा मतदारसंघ आपल्याकडेच राहणार असल्याची स्पष्टोक्ती उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मविआमध्ये जागावाटपावरुन वादाची ठिणगी पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’