उर्फीनंतर गौतमी पाटीलवर स्पष्टच बोलल्या चित्रा वाघ; म्हणाल्या, “जर ती अश्लील डान्स करत असेल…”

Chitra Wagh On Gautami Patil: डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिला अवघा महाराष्ट्र ओळखतो. तिच्या अश्लील डान्समुळे ती तरुणांईमध्ये नेहमीच चर्चेत असते. याच गौतमी पाटीलबद्दल प्रश्न विचारला असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला असून त्यांनी उर्फीविरोधात (Chitra Wagh vs Urfi Javed) आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्फीविरुद्ध सातत्याने कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांच्याकडून होत आहे. परंतु त्यांनी अद्याप गौतमी पाटीलबद्दल काही भूमिका का घेतली नाही, असा प्रश्न एका पत्रकाराने चित्रा वाघ यांना विचारला.

यावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या (Chitra Wagh On Gautami Patil) की, त्यांना गौतमी पाटील कोण आहे आणि ती काय करते हे माहिती नाही. जर माहिती असते तर मी नक्कीच आवाज उठवला असता आणि कारवाईची मागणी केली असती.

पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, गौतमी पाटील कोण आहे हे मला माहित नाही. गौतमी पाटील अश्लील डान्स करत असेल तर तिचा विरोध करायला पाहिजे. गौतमीच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे पाठवल्या असत्या तर मी त्यावर बोलले असते. मनोरंजन क्षेत्र आणि माझा दूर दूरपर्यंत संबंध नाही. गौतमी पाटील अश्लील डान्स करत हे तुमच्यापर्यंत आलं. म्हणजे ही गोष्ट इतर महिला नेत्यांकडेही आली असेलच. मग मग त्या चित्रा वाघची वाट पाहत होत्या का?

मात्र कुणीही याबाबत भूमिका का नाही घेतली. मात्र माझ्यापर्यंत ही गोष्ट आली असती तर मी नक्कीच भूमिका घेतली असती. मी स्वत: गौतमी पाटीलचे व्हिडीओ पाहिले नाहीत. माझ्यापर्यंत व्हिडीओ क्लिप्स आल्या असत्या तर मी नक्कीच विरोध केला असता, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.