‘त्यांना’ जामीन मिळाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही; संजय गायकवाड भडकले

Maharashtra Buldhana News: बुलढाण्यातील (Buldhana) मेहकर (Mehkar) शहरात लक्ष्मीपूजनाच्या (Laxmipujan) दिवशी काही समाजकंटकांनी धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली, तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी, काठी, दगडांनी मारहाण केली. घरात घुसून सामानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, आमदार संजय गायकवाड हे 40-50 वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते घेऊन मेहकरात पोहचले. यानंतर पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांचा जामीन झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार संजय गायकवाड म्हणाले, हा वाद धार्मिक कारणावरून आहे, मंदिरात आरती का लावता? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस का ठेवता?असल्या कारणांमुळे वाद झाल्याचं आमदार गायकवाड म्हणाले. आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांना जामीन मिळाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत