‘भाजपला स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर विश्वास नसल्याने विरोधी पक्षतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई’

Vidya Chavan:- भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या पक्षामधील कार्यकर्ते आणि नेत्यांवर विश्वास नसल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेची भीती दाखवून आपल्या पक्षात घेण्याचे प्रयोग सध्या भारतीय जनता पार्टी कडून करण्यात येत आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे.

चव्हाण म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकी दोन महिन्यावर आल्या आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेचा उपयोग करून घेता येणार नसल्यानेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून नोटीसा देण्यात आल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित दादा पवार यांना ईडी कडून उद्या चौकशीला हजर राहण्याकरिता नोटीस देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातील नेत्यांना देखील अशाच प्रकारे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता भाजपला धडा शिकवेल असे विद्या चव्हाण म्हणाल्य.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, आचारसंहितेमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून घेता येणार नाही, त्यामुळे ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या वापराने जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना त्रास देता येईल हे तत्व महाराष्ट्रात देवेंद्र फडवणीस यांनी राबवलेले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी जेवढ्या लोकांना आपल्या पक्षात वळवता येईल तेवढ्या लोकांना वळवण्याचा असफल प्रयत्न यांचा सुरू आहे असेही चव्हाण म्हणाल्या.

चव्हाण म्हणाल्या की, बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांची मुले यांचा प्रश्न, शासकीय परीक्षांसाठी सरकारने एवढी फी आकारणी का करावी, याला विरोध करण्यासाठी तरुण मुलांना न्याय देण्यासाठी व त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रोहित दादा पुढे सरसावलेले असताना त्यांना कसे जाळेबंद करता येईल यासाठी सरकारचा हा सर्व खटाटोप चालू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील कारण नसताना जेलबंद केले; ममता बॅनर्जींनी आपल्या राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या पोलीस दलाचा वापर करून ईडीच्या लोकांना सळो-की-पळो केले असेच यांना केले पाहिजे असे चव्हाण म्हणाल्या.

चव्हाण म्हणाल्या की, महिला, बेरोजगार युवक, राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आणि तो उद्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. खरंतर गृह खात्याची जबाबदारी असते की, कायदा सुव्यवस्था जपली पाहिजे परंतु पोलिसांनी जर अटकाव केला, तर तरुण मुलांना आणि महिलांना त्रास व्हायला नको. जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि ही सर्व कायदा सुव्यवस्था सांभाळणे हे पोलिस, प्रशासनाचे काम आहे आणि असे असताना आणखीन आगजोळ उसळायचा नसेल तर या फालतू ज्या काही चौकशा आहेत ते शासनाने ताबडतोब बंद केल्या पाहिजे एकीकडे राम मंदिर आणायचे, एकीकडे उद्घाटन करायचे आणि दुसरीकडे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या रोहित दादांसारख्या आमदाराला ईडीचा धाक दाखवणे हे योग्य नाही. आम्ही सर्व एकत्र लढू, आम्ही घाबरणार नाही असे विद्या चव्हाण म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या