Shirur LokSabha | शिवाजीदादांच्या हडपसरमधील रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद, कडाक्याच्या उन्हातही नागरिकांची गर्दी

Shirur LokSabha | हडपसर | राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या मतदार संघात काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आता या टप्यातील लढती स्पष्ट झाल्या आहेत.  यामुळे प्रचाराला आता वेग आला आहे,  शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ नुकतीच हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी, माळवाडी, १५ नंबर, साडेसतरानळी या परीसरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत समर्थन दाखवले.

हडपसर मधील हजारो नागरिकांनी या भव्य रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद देत ठिकठिकाणी औक्षण व स्वागत करीत महायुतीचाच विजय होणार याची ग्वाही दिली. उन्हाचा पारा वाढलेला असतानाही रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन