Manipal Hospital | मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे सर्वसमावेशक कॅन्सर सेंटरचे उद्घाटन दिग्गज क्रिकेटपटू कपिलदेव यांच्या हस्ते

कॅन्सर वर सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल (Manipal Hospital) ने प्रथमच अद्ययावत अशा कॅन्सर सेंटरची सुरुवात केली असून यामुळे आता कॅन्सरवरील विविध प्रकारचे उपचार हे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या सर्वसमावेशक कॅन्सर केअर सेंटर मुळे रुग्णांना सर्वसमावेशक उपचार हे आता त्यांच्या कॅन्सरच्या लढ्यातील विविध टप्प्यात उपलब्ध होणार असून अगदी निदाना पासून ते अंतिम उपचारांपासून बरे होण्यापर्यंतचा प्रवास या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या कॅन्सर केअर सेंटरचे उद्घाटन भारताचे दिग्गज क्रिकेट कप्तान आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते  कपिल देव यांच्या हस्ते करण्यात आले.

या नवीन केंद्रात कुशल, अनुभव आणि समर्पित असा चमू असेल, यामध्ये ऑन्को सर्जन्स, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट, फिजिशियन, मेडिकल फिजिसिस्ट्स, टेक्नॉलॉजिस्ट्स आणि तंत्रज्ञनांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या कडे कॅन्सरवरील उपचार आणि रुग्णांवर उपचार करण्याचा मोठा अनुभव आहे. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक अशा निदान पध्दती आणि अत्याधुनिक उपचारांचे पर्याय उपलब्ध असून यांत पेट सिटी, कोर बायोप्सी, मॅम्मोग्राम, बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट, केमोथेरपी, लायनॅक रेडिएशन थेरपी, कस्टमाईज्ड मेडिकल ऑन्कोलॉजी आणि पेन मॅनेजमेंट थेरपी अशा सर्व वयोगटासाठी उपयुक्त अशा उपचारांचा समावेश आहे.

या सर्वसमावेशक कॅन्सर केअर सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टरांचा एक संघ कार्यरत असेल यामध्ये डॉ. करण चंचलानी (रेडिएशन ऑन्कोलीजी), डॉ. लखन कश्यप (मेडिकल ऑन्कोलॉजी), डॉ. राहूल वाघ (ऑन्कोसर्जरी) आणि डॉ. राजेंद्र पोळ (हेमॅटोलॉजी) यांचा समावेश असून हे मणिपाल हॉस्पिटल (Manipal Hospital) बाणेर मधील कॅन्सर विभागाच्या विविध भागांचे नेतृत्व करतील.

कॅन्सर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितले “ कॅन्सरच्या विरोधातील युध्दामुळे अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्यांचे आयुष्य अधिक चांगले होण्यासाठी सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक अशा उपचारांची आवश्यकता असते, त्यामुळे त्याची चांगल्या जीवनाची आशा वाढते. बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल च्या या नवीन केंद्रामुळे कॅन्सरच्या उपचारांवरील सर्वसमावेशक उपचारांच्या दिशेने टाकलेले एक उत्तम पाऊल आहे, यामुळे पुण्यासह संपूर्ण भागात ही सुविधा प्राप्त होऊ शकेल. मला खात्री आहे की मणिपाल हॉस्पिटल मधील आरोग्य सेवांमुळे रुग्णांचा कॅन्सर विरोधातील लढा अधिक सक्षम होऊ शकेल.”

या सुरुवाती विषयी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल बाणेर चे क्लस्टर डायरेक्टर आनंद मोटे यांनी सांगितले “ या नवीन सर्वसमावेशक कॅन्सर सेंटर मुळे मणिपाल हॉस्पिटल बाणेर हे पुण्यातील काही निवडक अशा सर्वसमावेशक कॅन्सर केअर युनिट्स पैकी तर बनेलच पण त्याच बरोबर कॅन्सरच्या रुग्णांना समावेश उपचारही उपलब्ध होतील. आम्ही नेहमीच आमच्या रुग्णांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा देत असतो आणि हे नवीन केंद्र म्हणजे रुग्णकेंद्रीत दृष्टिकोन आणि क्लिनिकल कुशलतेचे उत्तम उदाहरण देत असतो. आमच्या कुशल अशा स्पेशॅलिस्ट्सचा चमू आणि अत्याधुनिक तंत्रज्ञाना मुळे आम्ही कॅन्सरशी लढा देणार्‍या रुग्णांना सक्षम करुन त्यांच्या जीवनाची गुणवत्ता चांगल्या प्रमाणावर वाढवू शकू.”

मणिपाल हॉस्पिटल बाणेर ने नेहमीच अत्याधुनिक उपचार आणि सर्वसमावेशक उपाय हे कॅन्सर रुग्णांपर्यंत उपलब्ध करुन देत असते जेणेकरुन त्यांचे जीवन अधिक चांगले होऊ शकेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हॉस्पिटल ने सर्व वयोगटातील (लहान मुलांसह) रुग्णांना केंद्रस्थानी ठेऊन सर्वसमावेशक उपचार उपलब्ध केले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?