प्रशंसनीय : सोलापुरात बहुतांश मशिदींकडून अजानवेळी भोंगे शांत

मुंबई – राज्यात सध्या भोंग्यांचा मुद्दा ( The issue of bumblebees ) चर्चेत असून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी यावरून अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सामान्य नागरिक, महिला, विविध पक्ष आणि संघटनांचा राज ठाकरे यांना पाठींबा मिळत असताना आता जुन्या शिवसैनिकांचा देखील राज ठाकरे यांना पाठींबा असल्याचे समोर येत आहे. याशिवाय अनेक मशिदींमध्ये भोंग्या शिवाय अजान ( Ajaan without bells in mosques ) दिली जात आहे.

दरम्यान, सोलापुरात ( Solapur ) बहुतांशी मशिदींमध्येही भोंग्याचा वापर न करता अजान दिली जात आहे. पहाटे, दुपारी आणि सायंकाळी मशिदींवरील भोंगे वाजले नाहीत ( The horns on the mosques did not sound ). त्यासाठी मशिदींचे विश्वस्त आणि मुतवल्लींसह पेशइमाम मंडळींनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे पोलीस खात्यावरील संभाव्य ताण कमी झाल्याचे दिसून आले.

अक्कलकोट ( Akkalkot ), माढा ( Madha ), करमाळा, बार्शी आदी विविध तालुक्यांमध्येही मशिदींमधील भोंग्यांचा वापर करणे बंद केल्याने सर्वत्र शांतता दिसून आली. या भागातही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.दरम्यान, पोलीस प्रशासनाने देखील अधिकृत परवाना असल्याशिवाय कोणत्याही प्रार्थनास्थळावर भोंगा वाजविता येणार नाही, असे दंडक घातले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. असा भोंग्याचा बेकायदेशीर वापर केल्याचे दिसून आल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.