Anis Sundke | धंगेकरांनी लुटली मुस्लिम समाजाच्या वफ्फ बोर्डाची जमीन, MIM उमेदवार अनिस सुंडकेंच्या आरोपने खळबळ

Anis Sundke | पुणे लोकसभा (Pune LokSabha) मतदारसंघात १३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच उमेदवारांकडून जोरदार यंत्रणा राबवली जात आहे. एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके (Anis Sundke) यांनी पुण्यामध्ये टिपू सुलतान यांच स्मारक उभारण्याची घोषणा केल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. यामध्येच आता सुंडके यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मुस्लिम वक्फ बोर्डाची मालमता काँग्रेसचे पुणे लोकसभा उमेदवार आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी शहर महापालिकेतील अधिकाऱ्यांना हताशी धरून संगनमताने बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केला आहे. धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून आता खासगी विकसक उत्कर्ष असोसिएट्‌सच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी- व्यावसायिक इमारत बांधली जात असल्याचा आरोपही सुंडके यांनी केला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच धंगेकरांच्या पत्नी आणि उत्कर्ष असोसिएट्स यांनी हा व्यवहार पूर्ण केला, असा आरोपही सुंडके यांनी केला आहे.

रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्याजवळ सर्व्हे नंबर 966 हा तब्बल 1 हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भूखंड वक्फ बोर्डाची मालमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भाडेकराराने देण्यात आला. सन 1947 नंतर कायद्‌याचा अंग करून वक्फ बोर्डाची ही मालमत्ता बँकेकडे गहाण टाकण्यात आली. बँकेने परस्पर त्याचा लिलाव केला. त्यानंतर गेल्यावर्षीच्या (2023) मार्पच-एप्रिल महिन्यात हा मोक्याचा भूखंड उत्कर्ष असोसिएशनतर्फे भागीदार वृषाली रावसाहेब शेंडगे, प्रतिभा रविंद्र धंगेकर, प्रतिक सुनिल अहीर यांच्या नावे करण्यात आल्याच सुंडके यांनी सांगितलं आहे.

लक्ष्मी रस्त्यावर मोक्याच्या जागी असणाऱ्या या मालमत्तेची बाजारभावाने आजची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे. या व्यवहारामुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणजे सर्वशक्तीमान अल्लाची देन असते. गरीब, मागास मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी ही मालमत्ता वापरायची असते. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनीच वक्फ बोर्डाचा अमूल्य भूखंड बड्या महापालिका अधिकाऱ्याशी संगनमत करून बळकावला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. त्यामुळे शासनाने या व्यवहाराची काटेकोर चौकशी करून वक्फ बोर्डाची मालमता परत करायला हवी, अशी मागणी देखील सुंडके यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार