Hemant Dhome | “मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी…”; अभिनेता हेमंत ढोमेची शरद पवारांना तब्येतीची काळजी घेण्याची विनंती

मराठी अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) त्याच्या अभिनयाबरोबरच राजकीय विषयांवर आपले मतदेखील मांडत असतो. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील लोकसभेसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र या वयात जास्त दगदग झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांच्या सोमवारच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. यावरुन मराठी अभिनेता हेमंत ढोमेने शरद पवारांना स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले आहे.

हेमंत ढोमे (Hemant Dhome) यानं शरद पवार यांचा एक फोटो ट्विटरला शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “आदरणीय साहेब…आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो…”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार