Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार, जाणून घ्या प्रकरण

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनात केलेले वक्तव्य आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन त्यांच्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले. वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत गंभीर चिंतेची बाब निदर्शनास आणून देण्यात येत आहे, असे पत्रात म्हटले आहे.

वडेट्टीवार यांनी, आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा निराधार दावा करून मतदारांची दिशाभूल करण्याची आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी करकरे यांच्या मृत्युमागे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची व पक्षाची बदनामी केली आहे, असे पत्रात म्हटले आहे. याविषयींची सर्व कागददपत्रे तक्रारीसोबत जोडण्यात आली आहेत.

वडेट्टीवार यांचे देशद्रोही विधान
26/11 मुंबई अतिरेकी हल्ला केस (अजमल कसाब) याची प्रथम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली व सर्व पुरावे, साक्षी तपासून न्यायालयाने आरोपी अजमल कसाब यास फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर आरोपी अजमल कसाब याला कन्फर्मेशन केस उच्च न्यायालयात दाखल केली. या अपीलामध्ये सुनावणी होऊन अजमल कसाब याची फाशी कायम केली व सर्वोच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम केली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जे देशद्रोही विधान केले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे व न्यायालयाचा अवमान देखील आहे.

भाजपाच्या निवडणूक विधी विभागाचे सहसंयोजक ॲ‍ड.शहाजीराव शिंदे, ॲ‍ड.मनोज जायस्वाल यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वडेट्टीवार यांच्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच पण राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेही दिसते. अशा कृती निष्पक्ष प्रचाराच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करतात. अशी विधाने केवळ आपल्या सशस्त्र दलांच्या व पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह उपसथित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे व राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्यांचे राजकारण करतात. या व्यतिरिक्त, लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी, निवडणूक चर्चा नागरी आणि तथ्यात्मक राहील याची खात्री करण्यासाठी योग्य कारवाई केली पाहिजे असा दावा करून कारवाईसाठी या तक्रारीच्या प्रती निवडणूक निर्णय अधिकारी, 29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, पोलीस महासंचालक,पोलीस आयुक्त, मुंबई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मरीन लाईन्स, पोलिस ठाणे यांनाही दिल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा