Prakash Ambedkar | काँग्रेसने वेळोवेळी दलितांना विषारी दात दाखवले ! प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवर घणाघात

Prakash Ambedkar | 1982 मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दलितांसाठी हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे. 2010 मध्ये, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पण काँग्रेसने हरिजन हा शब्द का वापरला?  याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे अहंकार. काँग्रेससारख्या सापाने वेळोवेळी दलितांना आपले खरे विषारी दात दाखवले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, गांधीजींनी अस्पृश्यांसाठी हरिजन हा शब्द वापरण्यास सुरुवात केली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास कडाडून विरोध केला आणि म्हटले की हा अपमानास्पद आणि फसवा शब्द आहे. जातिवाद आणि अस्पृश्यतेच्या वास्तविक समस्येवर गप्प बसवण्याचा हा प्रयत्न आहे.

ॲड. आंबेडकरांनी यामध्ये दलितांना संबोधित करत म्हटले आहे की, दलितांनी आता ठरवले पाहिजे की, सौंदर्यप्रसाधने आणि कुटुंबाच्या तालावर नाचणारी कठपुतळी काँग्रेसवर विश्वास ठेवायचा की, स्वतंत्र नेतृत्व असलेला आंबेडकरवादी पक्षावर, जो कोणत्याही जाणवेधाऱ्यांच्या तालावर कधीही नाचला नाही आणि कधी नाचणार नाही. ज्यांनी  दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींच्या राजकीय हक्कांसाठी काम केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप