Sushma Andhare | देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, सुषमा अंधारेंचा दावा

Sushma Andhare | महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं करण्याच्या विनंतीवर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांचं हे म्हणणं एकदम एक्झिट मागणं आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली त्यात खलबतं झाली. बावनकुळे यांना देखील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमध्ये नको आहेत. आपण स्वतःहून ते बाहेर पडत आहेत, ते बरं आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

जबाबदारीने मी हे बोलत आहे की फडणवीस कधीही विधानसभेला मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. भाजप आता त्यांना एक चेहरा म्हणून वापरणार नाही. एकवेळ विनोद तावडे यांना संधी दिली जाईल पण फडणवीस यांना नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

मी काल म्हणाले होते लोकांना वाटलं की मी उत्साहाच्या भरात बोलले. पण मी आज पुन्हा एकदा सांगते देवेंद्र फडणवीस यापुढे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत. भाजपाचे नेतृत्व आता कधीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार नाहीत, असे अंधारे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप