New Yearमध्ये ‘या’ ३ गोष्टींची घ्या विशेष काळजी आणि Depression पासून स्वत:ला ठेवा दूर

नवीन वर्षाचे (Happy New Year) स्वागत करण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत, नवीन वर्ष आपल्याला नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देते, अनेकदा आपण आपल्या विचारसरणीमुळे तणावाचे (Stress) किंवा नैराश्याचे (Depression) बळी ठरतो. त्यामुळे 2023 मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, त्या विसरणे तुमच्यासाठीच चांगले असेल. ‘चिंता चिता समान’ असे म्हणतात. म्हणूनच सकारात्मक विचार करून पुढे जाणे चांगले, अन्यथा खेद व्यक्त करून काहीही साध्य होत नाही. या विशेष लेखात, आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही नववर्षात स्वत:ला नैराश्यापासून दूर ठेवू शकता. (Take Care Of These 3 Things In The New Year)

नैराश्य ही एक मोठी समस्या आहे
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, नैराश्य हा एक सामान्य मानसिक विकार आहे, जो जगभरातील 5 टक्के प्रौढांना प्रभावित करतो. जगभरातील अपंगत्वाचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. तणावामुळे शरीराला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आकडेवारीनुसार, पुरुषांपेक्षा महिलांना नैराश्याचा धोका जास्त असतो. यामुळे कधी कधी आत्महत्याही होतात. त्यामुळे ते टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

नवीन वर्षात या 3 गोष्टींची काळजी घ्या
लेखक अनुभव अग्रवाल (Anubhav Agrawal) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, 2022 च्या कटू आठवणी विसरल्या पाहिजेत आणि नवीन वर्षात या 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

1. वाईट आठवणी विसरा
अनुभव अग्रवाल म्हणतात, ‘तुमचा भूतकाळाला तुमच्या भूतकाळात सोडा, यामुळे तुम्ही न जुन्या गोष्टी घेऊन बसणार, ना अतिविचार करणार’. अनेकदा जुन्या गोष्टी आठवून आपण अस्वस्थ होतो आणि विनाकारण नैराश्याचे बळी ठरतो. परंतु आपल्या चुकांना विसरून आपण भविष्यात काहीतरी चांगले करू शकता तेव्हा पुढे जाण्याची हीच वेळ आहे.

2. चुकांचा विचार करू नका
अनुभव पुढे म्हणतात, ‘तुम्ही तुमच्या चुकांवर पश्चात्ताप करून पुढे जाणार नाही, एकतर तुम्ही त्या सुधाराल किंवा तुम्ही पुढे जाल’. आपल्या चुकांचा पुन्हा पुन्हा विचार करून उपयोग नाही. आपण चुकांमधून शिकले पाहिजे आणि त्या पुन्हा न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

3. स्वतःचा आदर करायला शिका
अनुभव शेवटी म्हणाले, ‘तुम्ही तुमची मूल्ये आणि स्वाभिमान शीर्षस्थानी ठेवाल, कोणत्याही व्यक्तीच्या आणि कोणत्याही नातेसंबंधाच्या वरती. या 3 गोष्टींची काळजी घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात नव्या उत्साहाने, नवीन दृष्टिकोनाने आणि नव्या वृत्तीने करा.’ त्याचा अर्थ असा आहे की इतरांचा आदर करा, परंतु तुमच्या स्वाभिमान आणि तत्त्वांशी तडजोड करू नका.