शुबमन गिल आणि सारा तेंडूलकर खरोखरच एकमेकांना करतायत डेट? युएईच्या क्रिकेटरने सांगितलं सत्य

Shubman Gill-Sara Tendulkar: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि दिग्गज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या अफेयरच्या चर्चा सातत्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू असतात. २०२३ च्या विश्वचषकादरम्यानही सारा पुण्यात बांगलादेशविरुद्धचा आणि मुंबईत श्रीलंकाविरुद्धचा सामना पाहण्यासाठी आली होती, तेव्हा शुबमनच्या शॉटवर साराच्या प्रतिक्रिया अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. दरम्यान, यूएईच्या एका क्रिकेटपटूने एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल बोलून खळबळ उडवून दिली आहे. सारा आणि शुभमनच्या डीपफेक फोटोची चर्चा संपत नव्हती तोच या खेळाडूच्या मुलाखतीच्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली.

UAE च्या क्रिकेटरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
UAE चा क्रिकेटर चिराग सुरीचा हा मुलाखतीचा व्हिडिओ आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या एक-दोन दिवसांपासून इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओची बरीच चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेटरने शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर रिलेशनशिपमध्ये (Shubman-Sara Relationship) असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. इतकंच नाही तर दोघंही लग्न करणार असल्याचंही चिराग म्हणाला. मात्र, दोन्ही बाजूंनी असे काहीही बोलले गेले नाही. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच स्पष्टपणे सांगितले नाही.

खरं तर हा संपूर्ण व्हिडिओ एका मुलाखतीचा आहे. यादरम्यान चिराग सुरीला होस्टने विचारले की, लग्न करणारा पुढचा क्रिकेटर कोण असेल?, यावर तो म्हणतो, ‘शुबमन गिल… त्याची गर्लफ्रेंड सारा… सचिन तेंडुलकरची मुलगी आहे.’ चिराग पुढे म्हणाला, ‘तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जितके दूर राहण्याचा प्रयत्न करता तितकी ती जवळ येते, या दोघांसोबतही तेच घडत आहे.’ चिराग सुरीच्या या मुलाखतीच्या व्हिडिओवर काही कमेंट्स आल्या होत्या ज्यात हा व्हिडिओ बराच जुना असल्याचे सांगण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

प्रदूषणात घराबाहेर पडत असाल तर ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; दुष्परिणामांपासून करा स्वत:चा बचाव

पूर्ण कुटुंबासह परिणीती चोप्रा पोहोचली हनीमूनला, मालदीवमध्ये सासूसोबत पोज देताना दिसली

नास्तिक असलो तरीही रामसीतेच्या देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे- जावेद अख्तर