प्रसिद्ध हरियाणवी गायक राजू पंजाबी यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन

Haryanvi Singer Death: हरियाणवी गायक राजू पंजाबी (Raju Punjabi) यांचे वयाच्या ४० व्या वर्षी हरियाणातील रुग्णालयात निधन झाले. एका वृत्तानुसार, राजू पंजाबी काही काळ हरियाणातील हिसार येथील रुग्णालयात दाखल होता आणि त्याच्यावर काविळीचा उपचार सुरू होता. दरम्यान, गायकाच्या निधनामुळे हरियाणवी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी घरी परतले होते, मात्र त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही राजू पंजाबी यांच्या निधनावर ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राजूने काही दिवसांपूर्वी त्याचे शेवटचे गाणे ‘आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था’ रिलीज केले होते. त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट देखील त्याच्या गाण्याबद्दल आहे. राजूने 20 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ कोलाज शेअर केला आणि लिहिले, ‘आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा.’राजूने पंजाबी को अच्छा लगे से, देसी देसी, तू चीज लाजवाब, लास्ट पेग आणि भांग मेरे यारा ने यांसारखी गाणी गायली आहेत.