राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानाचं गुणरत्न सदावर्तेंकडून जाहीरपणे समर्थन

Mumbai – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात Dr. 62nd convocation ceremony of Babasaheb Ambedkar Marathwada University) बोलताना त्यांना शिवाजी महाराबाबत वादग्रस्त विधान केले होते.

दरम्यान, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते,’ हे ते म्हणाले. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र राज्यापालांच्या विधानाचे समर्थन केलं आहे. काही पराभूत मनोवृत्तींचे लोकं राज्यापालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्यपालांच्या वक्तव्याचा काही पराभूत मनोवृत्तीचे लोकं चुकीचा अर्थ काढत आहेत. ते पराभूत मनोवृत्तीचे लोकं आहेत, त्यांची नावे घेण्याची गरज नाही. या लोकांनी त्यांचे भाषण व्यवस्थितपणे ऐकावं. त्यांचं भाषण हे तात्वीक आहे. अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आज नितीन गडकरींसारखे अनेक नेते काम करतात. त्यामुळे शिवरायांचा आदर्श ठेऊन त्या पद्धतीने काम करा, असं म्हणणं कोणताही गुन्हा नाही. असा आक्षेप घेणारे पराभूत मानसिकतेतून अशी टीका करतात. राजकीय भूक भागवण्यसाठी त्यांच्याकडून टीका केली जात आहे, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले राज्यपाल?
‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.