बापासाठी अभिमानाचा क्षण! राहुल द्रविडच्या मुलाची ‘या’ अंडर-१९ संघात निवड

Rahul Dravid Son: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा मोठा मुलगा समित (Samit Dravid) याची विनू मांकड स्पर्धेसाठी (Vinoo Mankad Tournament) कर्नाटकच्या अंडर-19 संघात (Karnataka U-19 Team) निवड झाली आहे. आतापर्यंत समित कर्नाटककडून अंडर-14 क्रिकेट स्पर्धा खेळत होता, पण आता त्याने अंडर-19 क्रिकेटमध्येही प्रवेश केला आहे.

विनू मांकड एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे होणार आहे. यापूर्वी समितने 14 वर्षांखालील स्तरावर अप्रतिम कामगिरी केली आहे. 2019-20 हंगामात त्याने दोन द्विशतके झळकावली होती. समित त्याच्या वडिलांप्रमाणे बचावात्मक फलंदाजी करत नाही. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

याशिवाय समित चांगली गोलंदाजीही करतो. धीरज गौडाच्या नेतृत्वाखाली कर्नाटक संघ विनू मांकड स्पर्धेत खेळणार आहे, तर ध्रुव प्रभाकर संघाचा उपकर्णधार असेल. समितसोबतच संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत जे या स्पर्धेत आपली छाप सोडण्यासाठी उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई महापालिकेचे भूखंड व उद्याने दत्तक देण्याचे धोरण रद्द करा; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

वंचित बहुजन आघाडीचा Gautam Adani – Sharad Pawar भेटीवरून कॉंग्रेसला टोला !

ससूनमधील रुग्णांना ‘Virtual Reality’द्वारे ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन