Ravindra Dhangekar | धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल; जाणून घ्या आता नेमकं काय घडलंय?

पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यापाठीमागे अडचणीचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. कॉंग्रेसअंतर्गत कलहापासून ते वक्फ बोर्डाची जमीन हडपल्याचा आरोप धंगेकरांच्या पाठीमागे असतांनाच आता त्यांच्या विरोधात भाजपने निवडणुक आयोगात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मतदानाच्या आधीच धंगेकरांचा पाय आणखी खोलात जात असल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हिंदमाता प्रतिष्ठान तर्फे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अतंर्गत पर्वती विधानसभा मतदारसंघातील सातव हॉल सहकार नगर येथे सात मे रोजी संध्याकाळी भारतातील ११ संत महंत व शक्तिपीठांच्या पादुकांचा दर्शनाचा अभुतपुर्व सोहळा असे धर्माच्या संतांच्या नावावर फ्लेक्स छापून तिथे धंगेकरांचे (Ravindra Dhangekar) विनापरवाना प्लेक्स व साडी वाटप होतं असल्याची तक्रार भाजपच्या नेत्या अॅड माधवी निगडे यांनी निवडणुक आयोगाकडे दिली आहे.

माधवी निगडे यांनी यांनी तक्रार दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहिले असता धंगेकरांचा विनापरवाना प्लेक्स व साडी वाटप करतानाचे बॉक्स सापडल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर धंगेकरांचे नाव व फोटो छापलेले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने कलम १७१ व लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२७ ए अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजक सुमेध धनवट यांच्याविरोधात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती