Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर नताशाला पोटगीचे पैसे देण्यासाठी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये झाला सामील?

Hardik Pandya Divorce: नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. नताशाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून पांड्या आडनाव काढून टाकल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. आता नताशापासून घटस्फोट घेतल्यास हार्दिकला खूप आर्थिक नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, जर हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशापासून घटस्फोट घेतला तर क्रिकेटरला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के भाग गमवावे लागेल. हार्दिकला ही संपत्ती नताशाकडे हस्तांतरित करावी लागणार आहे. रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सपासून फक्त नताशाला घटस्फोटानंतर पोटगी देऊ शकेल म्हणून वेगळा झाला होता. मात्र, या सर्व दाव्यांमध्ये किती तथ्य आहे याची पुष्टी झालेली नाही.

हार्दिक पांड्याने गेल्या वर्षी त्याची आयपीएल टीम बदलली होती. तो गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. हार्दिकला मुंबईने 15 कोटींमध्ये साईन केले होते.

महत्वाच्या बातम्या-

Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Ashish Shelar | उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

KKR VS SRH | “आम्ही सर्वोत्तम संघांपैकी एक…”, फायनलपूर्वी हैदराबादचा कर्णधार कमिन्सचे केकेआरला आवाहन