Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Jitendra Awad | बीड लोकसभा मतदार संघात बोगस मतदान झाल्याचा खोटा आरोप करतांना दुसऱ्या राज्यातील व्हिडिओ सोशल मिडियावर टाकून जितेंद्र आव्हाडांनी आमच्या जिल्ह्याची बदनामी केली . तो व्हिडिओ बीडचा नसल्याचा खुलासा निवडणुक आयोगाने केला. आव्हाडांनी आता बीड जिल्ह्याच्या सिमेवर येवून नाक घासून बीड जिल्ह्याची जाहिर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.

जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awad) संगत चांगल्या लोकांची धरण्याची गरज वाटते . फसवेगिरी किंवा खोटे व्हिडिओ पुरवणाऱ्या लोकामुळे तुमची वेशीला टांगली जाते. मंत्री धनंजय मुंडेनी आव्हाडांना चार चांगले मित्र देण्याची गरज आहे .

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डोळ्यात तेल घालून निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडली . मात्र आशा खोटया आरोपामुळे जिल्ह्यासोबत प्रशासनाची बदनामी केल्या बद्दल जिल्हाधिकारी बीड यांनी जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आशी मागणी कुलकर्णी यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप