पत्रकार नवनाथ बन यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई – एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या पत्रकार नवनाथ बन (Navnath Ban ) यांनी एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. अतिशय अभ्यासू पत्रकार अशी नवनाथ बन यांची प्रतिमा असून त्यांनी अचानक राजकारणात  प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बन यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची भाजपा प्रदेश माध्यम प्रमुखपदी नियुक्ती केली गेली आहे. माध्यम क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून ते भाजपची धोरणे व विचारांना पोहचविण्याचे ते काम करतील. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असं म्हणत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले आहे.

दरम्यान, पत्रकारितेतील दीर्घ अनुभव आणि वैचारिकदृष्ट्या अतिशय प्रगल्भ असणाऱ्या नवनाथ बन हे आता एक दीर्घ राजकीय कारकीर्द गाजविण्यास सज्ज झाले आहेत. भाजपाचा नवीन प्रदेश माध्यम प्रमुख म्हणून नवनाथ बन हे आता कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.