सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला जबर धक्का! हार्दिक पंड्या उर्वरित स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी

Injured Hardik Pandya out from ICC World Cup 2023: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी ही बातमी मोठा धक्का आहे. टीम इंडियाच्या शेवटच्या लीग मॅच किंवा सेमीफायनल किंवा फायनलपूर्वी हार्दिक तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती, पण आता हे स्पष्ट झाले आहे की 2023 च्या विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमध्ये तो टीम इंडियासाठी कोणताही सामना खेळणार नाही. त्याच्या जागी प्रसिध कृष्णा (Prasidh Krishna) संघात दाखल झाला आहे.

2023च्या विश्वचषकात भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे. भारतीय संघाने सातपैकी सात सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. आता टीम इंडियाला 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत. यानंतर 15 किंवा 16 नोव्हेंबर उपांत्य फेरी होणार आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबरला विश्वचषक फायनल होणार आहे.

अशा परिस्थितीत हार्दिकच्या गैरहजेरीमुळे टीम इंडियाला त्यांच्या संयोजनात नक्कीच त्याची उणीव भासेल. ताज्या अपडेटनुसार, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला असून तो स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेश विरुद्ध भारताच्या विश्वचषक सामन्यात गोलंदाजी करताना पांड्याला डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. प्रसिध कृष्णा टीम इंडियात त्याची जागा घेणार आहे.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरी
19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध पहिले षटक टाकत असताना तो जखमी झाला. डाव्या घोट्याला दुखापत झाल्याने त्याने मैदान सोडले. यामुळे त्याला पहिले षटकही पूर्ण करता आले नाही. नंतर त्याच्या जागी विराट कोहलीने 3 चेंडू टाकले. या विश्वचषकात हार्दिक पांड्याची कामगिरी सरासरीची होती, त्याने गोलंदाजीत एकूण 5 बळी घेतले. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या केवळ एका सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, जिथे त्याने 11 नाबाद धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानचा खेळ बिघडला, सेमी फायनलची शर्यत बनली आणखी मनोरंजक

Video: Urfi Javed ला मुंबई पोलिसांकडून अटक? तोकडे कपडे घातल्याने रस्त्यावरुनच उचललं

दिवाळीला सोने विकत घेताना ‘या’ गोष्टी ध्यानात घ्या, नाहीतर होईल नुकसान!