World Cupमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पंड्या भावूक, दु:ख व्यक्त करत म्हणाला….

Hardik Pandya Emotional Statement: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या उर्वरित स्पर्धेतून बाहेर (Hardik Pandya Ruled Out Of World Cup) पडला आहे. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. आता स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर हार्दिक भावूक झाला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. संघासोबत राहून जल्लोष करत राहीन, असे हार्दिकने म्हटले आहे. भारताला सध्या साखळी फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघानेही उपांत्य फेरी गाठली आहे.

काय म्हणाला हार्दिक?
हार्दिकने लिहिले- विश्वचषकाच्या उर्वरित भागात मी खेळू शकणार नाही हे सत्य पचवणे कठीण आहे. मी संघासोबत उत्कटतेने असेन आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर त्यांचा जयजयकार करेन. सर्व शुभेच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. हे अविश्वसनीय आहे. हा संघ खास आहे आणि मला खात्री आहे की आपला सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी संघ करेल. माझे तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे.

महत्वाच्या बातम्या-

अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानचा खेळ बिघडला, सेमी फायनलची शर्यत बनली आणखी मनोरंजक

Video: Urfi Javed ला मुंबई पोलिसांकडून अटक? तोकडे कपडे घातल्याने रस्त्यावरुनच उचललं

दिवाळीला सोने विकत घेताना ‘या’ गोष्टी ध्यानात घ्या, नाहीतर होईल नुकसान!