Ind Vs Aus | अहंकारी मिचेल मार्शने अखेर गायलं रोहित शर्मा आणी टीमचं गुनगाण; म्हणाला, “भारताला मानलं”

टी20 वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना (Ind Vs Aus) भारताने मोठा धक्का दिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी ग्रोस आयलेटमध्ये खेळल्या गेलेल्या सुपर-8 फेरीच्या सामन्यात कांगारू संघाचा 24 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा करता आल्या. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे कर्णधार मिचेल मार्श नक्कीच नाराज झाला होता, पण तो आपल्या शब्दांतून व्यक्त न करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हा पराभव निराशाजनक असल्याचे मार्शने मान्य केले, पण भारतीय संघ खूप चांगला खेळला हेही त्याने मान्य केले. मिचेल मार्शने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या खेळीचे कौतुक केले.

मिचेल मार्श याचे विधान
मार्श म्हणाला. हे निराशाजनक आहे, तांत्रिकदृष्ट्या अंतिम 4 गाठण्याची आशा होती. आज भारतीय संघ (Ind Vs Aus) आमच्यापेक्षा चांगला खेळला. माझ्या मते 40 षटकांमध्ये अनेक लहान-मोठे फरक होते, पण प्रामाणिकपणे भारतीय संघ अधिक चांगला खेळला.

ऑसी कर्णधार पुढे म्हणाला, रोहित शर्माने उत्कृष्ट खेळी खेळली. रोहित शर्मा जर अशा मूडमध्ये असेल तर काय करू शकतो हे आपण 15 वर्षांपासून पाहत आहोत. त्याने चांगली सुरुवात केली आणि नंतर एक उत्कृष्ट खेळी खेळली. अशा लक्ष्याचा पाठलाग करताना, तुम्हाला बराच वेळ विकेट्सचे व्यवस्थापन देखील करावे लागते. पण भारताने आमच्याविरुद्ध शानदार खेळ केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप