फक्त PFI वरच का? आरएसएसवरही बंदी घातली पाहिजे; कॉंग्रेस खासदाराची मागणी 

नवी दिल्ली –  पीएफआय या वादग्रस्त संघटनेवर कारवाई करत गृह मंत्रालयाने पुढील पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी अनेक राज्यांमधून करण्यात आली. पीएफआयवर बंदी घातल्यानंतर सर्वच नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत जे आपले मत व्यक्त करत आहेत. याच प्रकरणावर केरळचे काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांचे वक्तव्यही समोर आले आहे.

कोडिकनील सुरेश (Kodikanil Suresh) यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ पीएफआयवरच बंदी का घालण्यात आली. आरएसएसवरही बंदी घातली पाहिजे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातल्यानंतर यावरून राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस खासदार पुढे म्हणाले, ‘पीएफआयवर बंदी घालणे हा उपाय नाही. आरएसएसवरही आम्ही बंदीची मागणी करतो. आरएसएस देशभरात हिंदू जातीयवाद पसरवत आहे. पीएफआय आणि आरएसएस समान आहेत, त्यामुळे सरकारने या दोन्हींवर बंदी घालावी.