IPL Playoffs: यंदा भारतीय कर्णधारांचीच हवा; आयपीएलच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा घडलंय असं

आयपीएल 2023 चा हंगाम हळूहळू त्याच्या समारोपाकडे जात आहे. आजपासून प्लेऑफचे सामने (IPL Playoffs) सुरू होत आहेत. अंतिम फेरीसह चार सामने प्लेऑफमध्ये खेळवले जातील. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) हे संघ मंगळवारी (23 मे) पहिल्या क्वालिफायरमध्ये (Qualifier 1) आमनेसामने असतील. त्याचवेळी बुधवारी (24 मे) एलिमिनेटरमध्ये (Eliminator) लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी (LSG vs MI) होणार आहे. यानंतर शुक्रवारी (26 मे) क्वालिफायर-2 खेळवला जाईल. रविवारी (28 मे) अंतिम सामना होणार आहे.

दरम्यान 11 वर्षांनंतर आयपीएलमध्ये प्लेऑफ किंवा शेवटच्या चारमध्ये पोहोचणाऱ्या चारही संघांचे कर्णधार भारतीय आहेत. यापूर्वी 2012 मध्ये एकदाच असे घडले होते. जाणून घेऊया…

2008 पासून, असे फक्त दोनदा (2012 आणि 2023 मध्ये) घडले आहे जेव्हा अंतिम चारमध्ये पोहोचलेल्या सर्व चार संघांचे नेतृत्व एका भारतीय खेळाडूकडे होते. उर्वरित मोसमात शेवटच्या चारमध्ये नेहमीच एक ना एक परदेशी कर्णधार राहिला आहे. आयपीएल 2008 ते 2023 या कालावधीत कोणत्या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा कर्णधार कोण होता ते जाणून घेऊया-

आईपीएल 2008 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
राजस्थान रॉयल्स- शेन वॉर्न
किंग्स इलेवन पंजाब- युवराज सिंह
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
दिल्ली डेयरडेविल्स- वीरेंद्र सहवाग

आईपीएल 2009 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
दिल्ली डेयरडेविल्स- वीरेंद्र सहवाग
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- अनिल कुंबले
डेक्कन चार्जर्स- एडम गिलक्रिस्ट

आईपीएल 2010 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
मुंबई इंडियंस- सचिन तेंदुलकर
डेक्कन चार्जर्स- एडम गिलक्रिस्ट
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
रॉयल चैलेंजर्स बैंगलौर- अनिल कुंबले

आईपीएल 2011 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
रॉयल चैलेंजर्स बैंगलौर- डेनियल विटोरी
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
मुंबई इंडियंस- सचिन तेंदुलकर
कोलकाता नाइट राइडर्स- गौतम गंभीर

आईपीएल 2012 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
दिल्ली डेयरडेविल्स- वीरेंद्र सहवाग
कोलकाता नाइटराइडर्स- गौतम गंभीर
मुंबई इंडियंस- हरभजन सिंह
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी

आईपीएल 2013 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
मुंबई इंडियंस- रिकी पोंटिंग/रोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स- राहुल द्रविड़
सनराइजर्स हैदराबाद- कैमरन व्हाइट

आईपीएल 2014 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
किंग्स इलेवन पंजाब- जॉर्ज बेली
कोलकाता नाइटराइडर्स- गौतम गंभीर
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
मुंबई इंडियंस- रोहित शर्मा

आईपीएल 2015 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स-महेंद्र सिंह धोनी
मुंबई इंडियंस-रोहित शर्मा
रॉयल चैलेंजर्स बैंगलौर- विराट कोहली
राजस्थान रॉयल्स- स्टीव स्मिथ

आईपीएल 2016 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
गुजरात लायंस- सुरेश रैना
रॉयल चैलेंजर्स बैंगलौर- विराट कोहली
सनराइजर्स हैदराबाद- डेविड वॉर्नर
कोलकाता नाइटराइडर्स-गौतम गंभीर

आईपीएल 2017 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
मुंबई इंडियंस- रोहित शर्मा
राइजिंग पुणे सुपरजाएंट- स्टीव स्मिथ
सनराइजर्स हैदराबाद- डेविड वॉर्नर
कोलकाता नाइटराइडर्स- गौतम गंभीर

आईपीएल 2018 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
सनराइजर्स हैदराबाद-केन विलियम्सन
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
कोलकाता नाइटराइडर्स- दिनेश कार्तिक
राजस्थान रॉयल्स- अजिंक्य रहाणे

आईपीएल 2019 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
मुंबई इंडियंस- रोहित शर्मा
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
दिल्ली कैपिटल्स- श्रेयस अय्यर
सनराइजर्स हैदराबाद- केन विलियम्सन

आईपीएल 2020 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
मुंबई इंडियंस- रोहित शर्मा
दिल्ली कैपिटल्स- श्रेयस अय्यर
सनराइजर्स हैदराबाद- डेविड वॉर्नर
रॉयल चैलेंजर्स बैंगलौर- विराट कोहली

आईपीएल 2021 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
दिल्ली कैपिटल्स- ऋषभ पंत
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
रॉयल चैलेंजर्स बैंगलौर- विराट कोहली
कोलकाता नाइटराइडर्स- इयोन मॉर्गन

आईपीएल 2022 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
गुजरात टाइटंस- हार्दिक पांड्या
राजस्थान रॉयल्स- संजू सैमसन
लखनऊ सुपर जाएंट्स- केएल राहुल
रॉयल चैलेंजर्स बैंगलौर- फाफ डुप्लेसिस

आईपीएल 2023 मध्ये अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ व कर्णधार
गुजरात टाइटंस- हार्दिक पांड्या
चेन्नई सुपर किंग्स- महेंद्र सिंह धोनी
लखनऊ सुपर जाएंट्स- केएल राहुल/क्रुणाल पांड्या
मुंबई इंडियंस- रोहित शर्मा