Bihar Election | काँग्रेसला VOTE बँकसाठी ओबीसी समाजाचे आरक्षण धर्माच्या आधारावर मुस्लिमांना द्यायचे आहे, भाजपाचा निशाणा

बिहारचे (Bihar Election) माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे लालू यादव यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. बिहारमध्ये निवडणूक रॅलीला (Bihar Election) संबोधित करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांचे आरक्षण लुटून ते मुस्लिमांना देण्याचा आरजेडी आणि काँग्रेसचा हेतू असल्याचा आरोप केला होता. यावर लालू यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे सांगितले आहे.

यावर आता भाजपाने निषेध दर्शवला आहे. “ओबीसी समाजाचे आरक्षण मुस्लिमांना दीले पाहिजे ” असं संतापजनक वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. इंडी आघाडीने आधीच कर्नाटकमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणात मुस्लिमांना सहभागी करून ओबीसी समाजावर अन्याय केलाच आहे परंतु काँग्रेसचे मनसुबे असे दिसत आहे की त्यांना ओबीसी समाजाचे आरक्षण VOTE बँक साठी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना द्यायचे आहे.

काँग्रेसने जनतेला उत्तर द्यावे की श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी, दलीत, ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण धर्माच्या आधारावर असलेले असंवैधानिक आरक्षण मुस्लिमांना देणार नाही, असे भाजपाने एक्स हँडलवरुन ट्विट करत म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा