धोनी-कोहलीमध्ये सबसे कातीलला आवडतो ‘हा’ क्रिकेटर; तर ‘या’ आयपीएल संघाची फॅन आहे गौतमी पाटील

मुंबई- सध्या सर्वत्र आयपीएलची हवा सुरू आहे. कारण आयपीएल २०२३ चा (IPL 2023) हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. प्रत्येक संघ शानदार प्रदर्शन करत सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. सोशल मीडियावरही अधिकतर आयपीएलच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. अशातच महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिने देखील आयपीएलमधील तिचा आवडता खेळाडू आणि आवडत्या आयपीएल संघाबद्दल खुलासा केला आहे.

नुकतंच गौतमीने ‘द ऑड इंजिनियर’ या सोशल मीडिया चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वेगवेगळ्या प्रश्नांची तिच्या हटके स्टाईलमध्ये उत्तरं दिली. याच मुलाखतीमध्ये गौतमीने तिचा आवडता क्रिकेटपटू आणि आवडता ‘आयपीएल’ संघ याबाबतही खुलासा केला आहे.

या मुलाखतीमध्ये गौतमीला रॅपिड फायरमध्ये आयपीएल संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिच्याकडे दोनच पर्याय होते. आवडता खेळाडू विराट कोहली की महेंद्रसिंह धोनी? यावार गौतमीने धोनी (MS Dhoni) असं उत्तर दिलं. तर आवडता ‘आयपीएल’ संघ या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी तिचे चाहते आतुर होते. आवडता संघ कोणता ‘मुंबई इंडियन्स’ की ‘चेन्नई सुपर किंग्स’? या प्रश्नावर गौतमीने ‘मुंबई इंडियन्स’ (Mumbai Indians) हे उत्तर देत तिच्या चाहत्यांना खुश केलं.