Dhule Loksabha | ”मला मिळणाऱ्या जनसमर्थनाला भाजप – काँग्रेस घाबरले आहेत”

Dhule Loksabha | वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) माजी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान हे धुळे लोकसभेच्या (Dhule Loksabha ) रिंगणात उतरले होते. मात्र, लाभाचे पद धारण केल्याचे सांगत त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आल्याचे अब्दुल रहमान यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

अब्दुल रहमान यांनी म्हटले आहे की, मी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मला मिळणाऱ्या व्यापक जनसमर्थनामुळे घाबरले होते. साडेचार वर्षांपासून मला पगार नाही. मी सरकारी खात्याचा भाग नाही. तरीही लाभाचे पद हे कारण सांगून माझे नामांकन रद्द करण्यात आले आहे. मी स्वतः युक्तिवाद केला आणि लेखी सबमिशन देखील दिले. तीन प्री-टाइप केलेल्या पानांची ऑर्डर मला देण्यात आली होती. वकिलांचा सल्ला घेऊन मी उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय