महागाईच्या जमान्यात Jio चा ग्राहकांना दिलासा; सर्वात स्वस्त प्लानची केली घोषणा

मुंबई – जिओने सर्वात स्वस्त 1 रुपयाचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान 1रु. मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्ही My Jio अॅपवरून ते घेऊ शकता.Jio च्या Rs 1 च्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. 100 MB हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमधील 100 MB डेटा मर्यादा संपल्यावर, इंटरनेट स्पीड 60 kbps पर्यंत खाली येईल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा दिलेली नाही. म्हणजेच या प्लॅनद्वारे तुम्ही तुमचे सिम सक्रिय ठेवू शकता. ज्यांना फक्त त्यांचे सिम अॅक्टिव्ह ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

ही सर्वात स्वस्त योजना आहे

जिओचा हा सर्वात स्वस्त प्लान आहे. Vodafone-Idea, Airtel किंवा BSNL आणि MTNL सारख्या इतर कोणत्याही कंपनीकडून 1 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अद्याप उपलब्ध नाही.

याचा फायदा तुम्हीच घेऊ शकता

Jio चा हा Rs 1 प्रीपेड प्लॅन फक्त निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामुळेच MyJio अॅपवर ते प्रत्येकाला दिसत नाही.

अशा प्रकारे तुम्ही ही योजना सक्रिय करू शकता

सर्वप्रथम तुम्हाला My Jio अॅप उघडावे लागेल. यानंतर, तुम्हाला रिचार्ज विभागात जावे लागेल आणि व्हॅल्यू विभागात जाऊन ते सक्रिय करावे लागेल.