Jitendra Awhad | ‘कोण राहुल’ असा सवाल करणा-याला जनतेने धडा शिकवला की ‘राहुल कोण आहे’

Jitendra Awhad | लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि एनडीएचं अबकी बार ४०० पारचं स्वप्न भंगलं, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना सोपवलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. राहुल गांधींच्या निवडीनंतर इंडिया आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी त्यांचं अभिनंदन केले आहे.

त्याचवेळी ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभा सदस्यपदी निवड झाली आहे. यावरुन इंडी आघाडीचे नेते त्यांचे अभिनंदन करताना टोलाही लगावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ओम बिर्ला यांना खोचक टोला लगावला आहे.

ट्विट करत त्यांनी लिहिले, याला म्हणतात ‘लोकशाही’ची ताकद. काही दिवसांपूर्वी गोदी मिडियाला मुलाखात देताना ‘कोण राहुल’ असा सवाल करणा-या व्यक्तीला देशातील जनतेने धडा शिकवला आहे, की ‘राहुल कोण आहे’. भारतीय संविधान चिरायू होवो, भारतीय लोकशाही चिरायू होवो!, असे त्यांनी लिहिले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप