राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा भारताबाहेरही जल्लोष; दक्षिण आफ्रिकी क्रिकेटर म्हणाला, ‘मी प्रार्थना करतो…’

Ram Mandir Ayodhya : अयोध्येत आज होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. घरोघरी श्रीरामाचे चित्र असलेले आकाशकंदिल; भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. चौकाचौकांतही भगव्या पताकांच्या माळा, श्रीरामांचं भव्य आकर्षक चित्र, विद्युत रोषणाई असं उत्सवी वातावरण कालपासूनच दिसत आहे.

शिवाजी मानकर

अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा आज सोमवारी पार पडणार आहे. या विशेष सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. देशभरातील अभिनेते, क्रिकेटपटू आणि राजकारणी राम मंदिर सोहळ्याचा आनंद व्यक्त करत आहेत. राम मंदिराच्या उभारणीबद्दल भारतातच नाही तर परदेशातही आनंद व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर केशव महाराज (Keshav Maharaj) यानेही एक व्हिडिओ जारी करून या सोहळ्याचा आनंद व्यक्त केला आणि भारतीय जनतेला शुभेच्छा दिल्या.

केशव महाराजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, ‘मी प्रार्थना करतो की सर्वत्र शांतता, सद्भावना आणि आध्यात्मिक जागृती नांदत राहो.’ याशिवाय दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या वतीने त्याने या विशेष प्रसंगी अभिनंदन केले आणि जय श्री रामचा नारा दिला.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी