‘तो मला साडीची पिन काढ म्हणाला…’, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सांगितला ‘तो’ अनुभव

प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या अभिनय कारकिर्दीत एकदातरी कास्टिंग काउचच्या (Casting Couch) अनुभवाला सामोरे जावे लागते. अगदी जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनादेखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

एका फिल्ममेकरचा पर्दाफाश करताना हेमा मालिनी म्हणाल्या,त्याला कोणता तरी एक सीन शूट करायचा होता. मी नेहमीच माझ्या साडीला पिन लावते. त्याने मला साडीची पिन काढायला सांगितली. मी म्हणलं साडी सुटेल. तर तो म्हणाला आम्हाला हेच हवंय. आजकालचे फिल्म निर्माता आपल्या कलाकाराला चांगलं दाखवण्यासाठी काहीच कष्ट घेत नाहीत. आजकाल फिल्मइंडस्ट्रीत काम करणं खूप आव्हानात्मक आहे. मला नाही वाटत मला परत काम करण्याची इच्छा होईल असंही त्या म्हणाल्या.