Kanchanjunga Express Accident | बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक

Kanchanjunga Express Accident | पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्टेशनवर सोमवारी (17 जून) सकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. याअपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. 25-30 जण जखमी झाले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. कांचनजंगा एक्सप्रेसने (Kanchanjunga Express Accident) मालगाडीची धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात आत्ताच झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. अजून माहितीची प्रतीक्षा आहे. डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथक मदतीसाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, एनएफआर झोनमध्ये एक अतिशय दुःखद दुर्घटना घडली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, NDRF आणि SDRF च्या टीम एकत्र काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप