गाजावाजा करत निवडणूक लढवणाऱ्या करुणा मुंडे यांना कोल्हापुरात पडली ‘एवढी’ मतं 

कोल्हापूर –  कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) yयांनी भाजपचे सत्यजित कदम (Satyjeet kadam)  यांचा 18,901 मतांनी पराभव केला  आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत.

दरम्यान,  बीडमधून थेट धनंजय मुंडे यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेल्या करुणा शर्मा मुंडे (karuna Sharma Munde) यांना कोल्हापूरमध्ये मात्र मोठा पराभव पत्करावा लागला आहे. करुणा शर्मा यांचं डिपॉझिट देखील या निवडणुकीत जप्त झालं असून करुणा मुंडे यांना या निवडणुकीत अवघी १३३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचं डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे.