ये दुख काहे खत्म नहीं होता बे…! शुबमन गिल आणि सारा अली खान यांचं ब्रेकअप?

गुजरात टायटन्सचा मातब्बर सलामीवीर शुबमन गिल याने मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर २ सामन्यात शानदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने मुंबईवर ६२ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता रविवारी (२८ मे) गुजरात विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२३चा अंतिम सामना रंगेल. मात्र या सामन्यापूर्वी शुबमनसाठी दुख:द बातमी पुढे आली आहे.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) यांच्या रिलेशनशिपची चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे.. शुभमन गिल नक्की कोणाला डेट करत आहे.. अशा देखील चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण आता सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. सारा अली खान आणि शुभमन गिल यांचं ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खान आणि शुभमन गिल यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. सोशल मीडिया कमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या नात्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. पण आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. ज्यामुळे सारा अली खान आणि शुभमन गिल यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी यावर मौन बाळगलं आहे.