न्यायालयाने निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही – वळसे पाटील 

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.  न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, न्यायालयाने निर्णयात भोंगे काढा असं कुठेही लिहिलेलं नाही रात्री 10 ते सकाळीं 6 लावू नये असं लिहिलेलं आहे, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip valase patil)  यांनी केले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यांना जी प्रार्थना करायची आहे ती घरात करावी, मंदिरात करावी, उगाचच सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. असं त्यांनी म्हटले आहे.