Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Vanchit Bahujan Aghadi Loksabha Candidate: प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नांदेड, परभणी, औरंगाबाद, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांनाही पाठींबा देणार असल्याचे यावेळी वंचितने जाहीर केले आहे.

वंचितच्या नव्या यादीनुसार, पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे येथे महायुती (मुरलीधर मोहोळ), महाविकास आघाडी (रविंद्र धंगेकर) आणि वंचित अशी तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. तसेच शिरूर येथून मंगलदास बाहुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेड येथून अविनाश बोसीकर, परभणीतून बाळासाहेब उगले आणि औरंगाबाद येथून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका