LokSabha Elections | “देशाची निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही याची शंका असल्याने लोकसभा निवडणुकीकडे जगाचं लक्ष”

LokSabha Elections | देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, आज महाराष्ट्राची निवडणूक चार ते पाच टप्प्यांनी घेतली आणि दुसऱ्या बाजूने तमिळनाडूमध्ये बघितलं तर तमिळनाडूची निवडणूक एका दिवसात झाली, उत्तर प्रदेशची दोन दिवसांमध्ये झाली, मगमहाराष्ट्रातच चार किंवा पाच दिवस का? त्याचे कारण हे आहे, की मोदी साहेबांना खात्री नाही, त्यांना पुन्हा पुन्हा येता यावं, यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक त्यांनी बदललं आणि आज या पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत.असे शरद पवार म्हणाले आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, लोकशाही म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार घटनेने तुम्हाला दिला, आणि तो निर्णय तुम्ही मतपेटीद्वारे घ्यावा, याचा अर्थ संसदीय लोकशाही. आज त्याची चिंता सबंध देशात आहे.असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले आहे.

शरद पवार म्हणाले की, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या ज्या प्रकारे निवडणुका होत नाहीयेत, तसेच चित्र आपल्याला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. ते येऊ द्यायचं नसेल तर वाटेल ती किंमत देऊ, पण लोकशाही ही आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, हा निकाल तुम्हा-आम्हा सर्वांना घ्यायचा आहे. असेही शरद पवार यानी म्हटले आहे.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, मोदी साहेबांच्या प्रत्येक भाषणामध्ये मी काय, उद्धव ठाकरे काय यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्यावर टीका टिप्पणी करतो, माझ्या दृष्टीने तो आमचा बहुमान आहे. कारण त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत पंतप्रधान मोदींना सांगायचंय, राज्यात हा आत्मा ५० वर्ष नाही तर ५६ वर्षांपासून फिरत आहे. कारण मला राज्यातील विधानसभेत येऊन यंदा ५६ वर्ष झाली. ५६ वर्षे हा आत्मा शोधतोय की, मोदीसारखी कोणी व्यक्ती आलेली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या. कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले. राजीव गांधी पाहिले. नरसिंह राव पाहिले. अनेकांबरोबर काम केले. यांची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोण तरी एका आत्मा याची चिंता मोदींना वाटते. तो आत्मा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला, या आत्माची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल, यासाठी तो महाराष्ट्रात फिरतो आहे. असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, ही लोकसभेची निवडणूक (LokSabha Elections) वेगळ्यापद्धतीची आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली की, एकाचवेळी देशाचे मतदान व्हायचे. जास्तीत जास्त दोन दिवसात निवडणूक व्हायची. आज महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यात घेतली आहे. परंतु उत्तरप्रदेशात निवडणूक दोन दिवसात होत आहे. महाराष्ट्रातील पाच दिवस का? कारण की, मोदींना खात्री नाही. त्यांना पुन्हा-पुन्हा येता यावे. यासाठी महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक त्यांनी बदलले. देशातील लोकशाही संकटात आहे. जगात अमेरिका आणि भारत या दोन देशात मोठी लोकशाहीपद्धतीने निवडणुका होतात. अमेरिकेच्या जनतेला देखील भारतच्या निवडणुका, कशा होणार याची चिंता आहे. या निवडणुकीत लोकशाहीच्या पद्धतीने होते की नाही, याबाबत साशंकता लोकांच्या मनात आहे. जगाला सुद्धा देखील चिंता आहे. जगाचा सुद्धा मोदींवर विश्वास आहे का नाही, ही स्थिती आहे असे शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन