मराठी माणूस पेटून उठल्यावर उच्चपदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते – महेश तपासे

मुंबई   – मराठी माणूस स्वाभिमानासाठी पेटून उठतो तेव्हा उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीलादेखील भूमिका बदलावी लागते हे त्याचे उदाहरण आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बदललेल्या वक्तव्यावर भाष्य केले.

मागच्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल जे वक्तव्य केले होते त्यासंदर्भात मराठी लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारी गुजरात फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमराठी लोकांनी मराठी शिकावे असे वक्तव्य राज्यपाल यांनी केले आहे. या वक्तव्याचे महेश तपासे यांनी स्वागत करताना महाराष्ट्रात राहणार्‍यांनी मराठी शिकली व बोलली पाहिजे असे स्पष्ट केले.