Muralidhar Mohol | गणेश मंडळांसह नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा

पुणे लोकसभा (PuneLoksabha) मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह, नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथक यांनी जाहीर पाठिबा दिला आहे. गणेश मंडळांचा कार्यकर्ता संसदेत गेला पाहिजे, त्या माध्यमातून पुण्याच्या प्रश्नासमवेत गणेश मंडळांचे प्रश्न शासनदरबारी जातील आणि ते सुटतील अशी भावना मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी यावेळी व्यक्त केली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Puneet Balan) यांच्या पुढाकाराने प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळ, नवरात्रौ मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांच्या मेळाव्याचे शुभारंभ लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यासह सुनील रासने, महेश सूर्यवंशी, शैलेश टिळक, राहुल जाधव, नितीन पंडित, विकास पवार, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे, निलेश वकील, संजीव जावळे, युवराज निंबाळकर, नवनाथ पठारे, हेमंत रासने, राजेंद्र अण्णा देशमुख, प्रवीण तरडे, अजय भोसले, आनंद सागरे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्यात बोलताना पुनीत बालन म्हणाले, या मेळाव्याचे आयोजन केल्यानंतर मला अनेकांनी विचारले की तुम्ही भाजपचे काम करता का , त्यावर मी कोणत्याही पक्षाचा राजकीय कार्यकर्ता नाही तर गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे. मुरलीधर मोहोळ हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते असून ते माझे मित्र आहेत. गणेश मंडळ हे नाळ आहे, राजकीय सामाजिक असो अथवा कोविड, स्वाईन फ्लू असे साथीचे आजार असोत मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरतो. आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला दिलीला पाठवायचे आहे. मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी पोहचतात. त्यामुळे येत्या १३ मे ला कोणावरही दबाव न आणता जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन बालन यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी म्हणाले, यांनी सास्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि आयटी अशा सर्वच क्षेत्रात पुण्याचा देशभरात लौकिक आहे. हा लौकिक वाढवायचा असेल तर मंडळाचा कार्यकर्ता संसदेत पाहिजे. त्यासाठी आपल्याला मोहोळ यांना पाठिंबा द्यावा लागेल. ते संसदेत गेले तर निश्चितपणे मंडळाचे प्रश्न शासनदरबारी जातील.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, शैलेश टिळक, अभिनेते प्रविण तरडे, धीरज घाटे यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत मोहोळ याना जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन